सातारा,दि.31 :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली असून आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. जिल्हयात आचारसंहिता लागू असल्याने जिल्हा व तालुका स्तरावरील लोकशाही दिन नोव्हेंबर २०२४ या आयोजित करण्यात येणार नाही. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी कळविले आहे.