फलटण प्रतिनिधी :- मौजे उपळवे येथील कारखान्याच्या मालकीची 3 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या ट्रॅक्टर गाड्या चोरून नेल्या प्रकरणी फलटण ग्रामीण परिसरात एका जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १०/०३/२०२३ रोजीचें रात्री ८ ते दि. ११/०३/२०२३ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान मौजे उपळवे ता. फलटण गावाच्या हद्दीत कॅनॉलचे पुलाजवळील तळावरुन अंबादास बाळू सांगळे (रा. माळेगाव ता.शिरुर कासार जि.बीड) याने फिर्यादी विनय राजेंद्र पुजारी (रा. उपळवे ता. फलटण) यांच्या कारखाण्याच्या 3 लाख 75 हजार रुपये किंमतीची तीन केसरी रंगाचे ट्रॅक्टर गाड्या लोखंडी जुगाड नंबर 271,282 व 355 हे संमत्तीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरुन नेले आहे. याप्रकरणी विनय पुजारी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा.पो.फो. राऊत करत आहेत.