28 व 29 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी विभागीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये उत्तरेश्वर हायस्कूल विडणीची विद्यार्थिनी कु. तृप्ती संजय बुरुंगले हिने उज्वल यश संपादन करून तिची राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उत्तरेश्वर हायस्कूल व जुनिअर कॉलेज विडणीची (ता. फलटण जि. सातारा) विद्यार्थिनी कु. तृप्ती संजय बुरुंगले हिची राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस क्रीडा प्रकारांमध्ये निवड झाली आहे. तालुका स्तरावरून उत्तरेश्वर हायस्कूलच्या 17 वर्षा खालील 'मुली गटा' मध्ये दोन विद्यार्थिनींची निवड झाली होती. त्यानंतर जिल्हास्तरावर झालेल्या स्पर्धेमध्येही त्यांनी विजयी घोडदौड कायम राखत जिल्ह्यात कु. तृप्ती संजय बुरुंगले हिने प्रथम क्रमांक व कु.सिद्धी चंद्रकांत नाळे हिने तृतीय क्रमांक पटकाविला होता. दिनांक 28 व 29 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी विभागीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये उत्तरेश्वर हायस्कूल विडणीची विद्यार्थिनी कु. तृप्ती संजय बुरुंगले हिने उज्वल यश संपादन करून तिची राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव अभंग ,उपाध्यक्ष हरिभाऊ शेंडे ,सचिव सहदेव शेंडे तसेच सर्व संचालक मंडळ व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिर्के मॅडम , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर सॉफ्ट टेनिस सातारा जिल्हा संघटनेचे सचिव वसंत मुळीक यांनीही अभिनंदन केले. या विद्यार्थिनीला शाळेचे क्रीडा शिक्षक काशिनाथ सोनवलकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.