Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

 ‘त्या’ युवकांच्या  केसालाही धक्का लागू देणार नाही

नरेंद्र पाटील यांचा इशारा: दगडफेकप्रकरणी तरुणांना पोलिस संरक्षण द्या
टीम : धैर्य टाईम्स
राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणार्‍या तरुणांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकी दिली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांची तक्रार नोंदवून घ्यावी. तसेच त्यांना त्यांचा जीव धोक्यात असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे,’ अशी मागणी माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

सातारा : ‘राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणार्‍या तरुणांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकी दिली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांची तक्रार नोंदवून घ्यावी. तसेच त्यांना त्यांचा जीव धोक्यात असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे,’ अशी मागणी माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

नरेंद्र पाटील येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ’मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही म्हणून या समाजातील तरूण संतप्त झाले आहेत. ते कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, याचा शोध लावत बसण्यापेक्षा आरक्षण देण्यात आपण कमी पडलो हे सरकारने मान्य करावे. आमदार शशिकांत शिंदे यांनी या दगडफेक करणार्‍या तरुणांच्या घरी जाऊन यांना धमकी दिली आहे. जेव्हा युतीचे सरकार सत्तेत होते, तेव्हा मराठा मोर्चाच्या वेळी महामार्गाच्या पुलाखाली दगड कुणी आणून ठेवले. कुठल्या आमदारांच्या सांगण्यावरून हे कृत्य केले गेले होते, हे सर्वांना माहीत आहे. आता आमदार शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका बदलली आहे. आता न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री सांगताहेत वास्तविक हा निर्णय हा राज्यपातळीवर घ्यायला पाहिजे केंद्राचे याचा काही संबंध नाही. आरक्षण मिळाले नसल्याने मराठा समाजातील तरुणांच्या भावना तीव्र झालेले आहेत. ही मुले मराठा आहेत म्हणून तर त्यांनी रागातून दगडफेक केली. हे कुठल्या एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत असे आमदार शिंदे म्हणाले आहेत. या मुलांना धमकावले गेले आहे त्यामुळे त्यांना आम्ही वार्‍यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. समाजाला आरक्षण देण्यात आणखी वेळ गेला तर मोठा उद्रेक होईल असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.

पाटील पुढे म्हणाले,  मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टाने फेटाळले, याला कारण राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने युक्तीवाद केला आहे. त्यामुळे मराठा युवकांमध्ये मोठा असंतोष आहे. त्याच उद्विग्तनेतून गुरुवारी काही मराठा युवकांकडून कृत्य घडले आहे. मात्र, एक आमदार पोलिसांआधीच त्यांच्या घरी जावून धमकावत आहे. मात्र, त्या युवकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्यांच्या पाठीशी ठाम आहोत,  जे सातारामध्ये घडले ते कमीच घडले. आरक्षणाच्या निर्णयाच्या असंतोषातून ही प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. परंतु, एक आमदार त्या पोरांच्या घरी जाऊन धमक्या देतो. ही कसली संस्कृती? एस. पी. साहेबांनी यावेळचा व्हिडीओ पाहावा, त्यांनी जो व्हिडिओ दिला तो पोलिसांनी रेकॉर्डवर घ्यावा. त्या युवकांना पोलिस संरक्षण द्यावे, त्यांच्या घरातून कोणी तक्रार द्यायला आले तर पोलिसांनी नोंदवून घ्यावी . मराठा आरक्षणावर बोलण्यापेक्षा धमकीची भाषा वापरणार्‍यांचे मराठा जातीवरचे प्रेम हे पूतना मावशीचे प्रेम असल्याचा टोला नरेंद्र पाटील यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता लगाविला.

मी मराठा आहे.. कोणाच्या सर्टिफिकेेटची गरज नाही : आ. शशिकांत शिंदे 
दरम्यान, माजी आ. नरेंद्र पाटील यांनी प्रथम अभ्यास करावा. जनतेच्या भावनांशी खेळू नये. मी मराठा आहे, यासाठी मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे प्रत्युत्तर आ. शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांच्या टिकेला दिले आहे. मी मराठा समाजाचे कधीही राजकारण केले नाही. मी प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम केले आहे. सातारा किंवा नवी मुुंबईमध्ये जी आंदोलने झाली त्यावेळी मी पुढाकार घेतला आहे. सातार्‍यात राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणारे युवक मराठाच होती. त्यांनी असंतोषातून काही निर्णय घेतला. मात्र, त्या युवकांच्या घरी जावून मी दमबाजी केली नाही. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या युवकांना मी मदत करत आहे. त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणार असून वार्‍यावर सोडणार नाही, असेही आ. शिंदे यावेळी म्हणाले. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER