सातारा दि. 28 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, साताराचे अखत्यारीत सैनिकी मुला/मुलींचे वसतिगृह सातारा येथे अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 10 जुलै 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा/सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृह सातारा येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे. तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. सहाय्यक वसतिगृह अधीक्षक सैनिकी मुलांचे वसतिगृह, सातारा, सहाय्यक वसतिगृह अधिक्षिका सैनिकी मुलींचे वसतिगृह, सातारा, चौकीदार सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृह सातारा. या पदभरतीमध्ये माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना प्राधान्य देण्यात येईल. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे कळवतात.
















