श्रीमंत रामराजे युवा मंचच्या वतीने येथील घडसोली मैदानावर आयोजित केलेल्या छत्रपती संभाजीराजे चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये 'आयुष हवेली' संघ विजयाचा मानकरी ठरला.
फलटण : श्रीमंत रामराजे युवा मंचच्या वतीने येथील घडसोली मैदानावर आयोजित केलेल्या छत्रपती संभाजीराजे चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये आयुष हवेली संघ विजयाचा मानकरी ठरला असुन उपविजेता म्हणुन ओवी डेव्हलपर्स संघ ठरला. स्पर्धेची सुरुवात व उद्घाटन युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १६ निमंत्रित संघाना संधी दिली होती. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळवली. तसेच प्रत्येक संघात दोन आयकॉन घेण्याची मुभा दिली होती. स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आयुष हवेली संघ व ओवी डेव्हलपर्स यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. यामध्ये अटीतटीच्या लढतीत आयुष हवेली संघाने ओवी डेव्हलपर्स फलटण या संघावर मात करत विजय संपादन केला.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १ लाख रोख व चषक, द्वितीय क्रमांक ५१ हजार व चषक, तृतीय क्रमांक ३१ हजार व चषक, चतुर्थ क्रमांक २१ हजार व चषक अशाप्रकारे बक्षीस देण्यात आले. मालिकावीर म्हणून आयुष हवेली संघाचा शेरू लोहार याला सायकल देऊन सन्मानित केले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून नरसिंग पालम पल्ली, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विजय खडके यांना सन्मानित केले. तृतीय क्रमांक आयुर मॅक्स बारामती चतुर्थ क्रमांक एस जे टायगर्स आंबेगाव या संघाना मिळाला.
यावेळी दोन्ही संघाला मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुकाध्यक्ष प्रा. रमेश आढाव, पं. स. माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, फलटण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार इंगळे, युवा उद्योजक अमित भोईटे, दादासाहेब चोरमले, अमोल भोईटे, भाऊसाहेब कापसे, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, पै. पप्पू शेख आदींच्या हस्ते पारितोषिक दिले. स्पर्धेसाठी राहुल निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमीर शेख, आरीफ महात, अश्फाक महात आदींनी परिश्रम घेतले.