Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव दि.२९ जानेवारी २०२३ रोजी

गायन, अभंग, चित्रपट संगीत, वाद्यवादन जुगलबंदी आणि नृत्याची फलटणकर रसिकांसाठी पर्वणी
टीम : धैर्य टाईम्स

फलटण शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शहर आणि परिसर शैक्षणिक, कृषी औद्योगिक प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करीत असताना शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपला गेला पाहिजे किंबहुना तो वृध्दींगत झाला पाहिजे.

 या बदलत्या काळात समाजाची सांस्कृतिक जडणघडण आणि संस्कारमूल्ये यांचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने २०२० पासून कला प्रसारक संस्था आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांनी पुढाकार घेऊन फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सवाची सुरुवात केली असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

 यावर्षी हा महोत्त्सव रविवार दि.२९ जानेवारी रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित केला आहे. त्या माध्यमातून गायन, वादन आणि नृत्य अशी परिपूर्ण, कोणीही चुकवू नये अशी सांगीतिक मेजवानी यानिमित्ताने फलटणकर व परिसरातील रसिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.   

कार्यक्रमाचे नियोजन कला प्रसारक संस्थेच्या संस्थापिका सौ.भाग्यश्री संजीवन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून या महोत्सवातील एका सत्रामध्ये सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांचे बहारदार गायन आणि दुसऱ्या सत्रामध्ये अनुप कुलथे, निखिल पटवर्धन आणि राहुल आचार्य यांची व्हायोलिन, सतार आणि तबल्यावरील आकर्षक जुगलबंदी सादर होईल. याशिवाय राजसी वाघ यांच्या भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचीही झलक अनुभवण्यास मिळणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक संजय भुजबळ करणार आहेत. 

शांतीकाका सराफ यांचे रिंग रोडवरील नवे दालन, बुलढाणा अर्बन पतसंस्था, जोशी हॉस्पिटल्स, के.बी.एक्सपोर्टस, दिशा अकॅडमी आणि ग्रीनफील्ड ऍग्रीकेम हे या महोत्सवाचे सहप्रायोजक असणार आहेत.

या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे मोफत प्रवेश पास प्रायोजक आणि सहप्रायोजक यांच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. फलटण शहर व परिसरातील अधिकाधिक रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संजीवराजे नाईक निंबाळकर  आणि सर्व प्रायोजकांनी केले आहे.

फलटण शहरातील मुधोजी हायस्कूल या मध्यवर्ती प्रशस्त जागेत, वाहन तळ सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी होत असलेल्या या महोत्सवाद्वारे शास्त्रीय गायन, अभंग, चित्रपट संगीत, वाद्यवादन जुगलबंदी आणि नृत्याच्या मेजवानीचा आनंद घेत फलटण शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा वृध्दींगत करण्याची संधी या निमित्ताने लाभणार असून फलटण व पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER