फलटण प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी २८ व २९ फेब्रुवारी दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर ५ मार्चपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे. कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना व तिन्ही कंपन्यांची सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ वाजता पासून कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत.
फलटण विभागीय कार्यालय अंतर्गत येणारे तिन्ही कंपन्याचे कंत्राटी व आउसोर्सिंग कामगार संपावर गेले आहेत. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी पहिल्या टप्यात २८ फेब्रुवारीपासून ४८ तास व दुसऱ्या टप्यात ५ मार्चपासून बेमुदत कामबंदची नोटीस तिन्ही कंपनी प्रशासनाला दिली होती. यावरून कामगार आयुक्त संतोष भोसले यांनी २६ फेब्रुवारीला तिन्ही कंपनी व वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीला बैठकीसाठी बोलावले. परंतु ही बैठक निष्फळ ठरली. यावेळी सातारा जिल्हा अध्यक्ष माऊली गाढवे, सतिश टिळेकर, सतिश जाधव, देवानंद सोनवलकर, रजनीकांत सोनवणे, वैभव नाळे, महिला अध्यक्ष फैमीदा मेटकरी, नेहा पालकर व सर्व आऊटसोर्सिंग कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.