Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत

ज्ञान आणि कौशल्याचा समाजाच्या उद्धारासाठी उपयोग करा

देवेंद्र फडणवीस : कृष्णा विद्यापीठात दीक्षांत सोहळा संपन्न
टीम : धैर्य टाईम्स
Use knowledge and skills for the betterment of society
उच्च शिक्षण आणि पदवी प्राप्त केल्यांनतर बहुतांशी जणांचा प्रोफेशनल करिअरकडे ओढा असतो. परंतु, त्याआधी युवा पिढीने आपल्या उमेदीच्या काळात ज्ञानाचा आणि कौशल्याचा समाजाच्या विकासासाठी व उद्धारासाठी उपयोग करावा. आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असताना केवळ पैसा ही प्रेरणा न ठेवता समाजाची सेवा आणि ज्ञान प्रेरणास्थानी ठेवावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कराड : उच्च शिक्षण आणि पदवी प्राप्त केल्यांनतर बहुतांशी जणांचा प्रोफेशनल करिअरकडे ओढा असतो. परंतु, त्याआधी युवा पिढीने आपल्या उमेदीच्या काळात ज्ञानाचा आणि कौशल्याचा समाजाच्या विकासासाठी व उद्धारासाठी उपयोग करावा. आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असताना केवळ पैसा ही प्रेरणा न ठेवता समाजाची सेवा आणि ज्ञान प्रेरणास्थानी ठेवावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा रविवारी ५ रोजी १० वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, कुलपतींचे प्रधान सल्लागार वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, डॉ. अतुल भोसले, कर्नाटकचे उद्योगमंत्री ना. मुरुगेश निराणी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक ओमप्रकाश शेटे, परीक्षा नियंत्रक डॉ.आर.के. गावकर, कुलसचिव डॉ.एम.व्ही. घोरपडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विनायक भोसले, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ.टी.पू. विष्णूदेवी, स्नेहल मसूरकर, मनिषा मेघे, दिलीप पाटील, पी.डी. जॉन, डॉ. सबिता राम, डॉ. अक्षता कोपर्डे, डॉ. ज्योती साळुंखे, डॉ. रेणुका पवार, डॉ. स्वप्ना शेडगे, संशोधन संचालक डॉ. अरुण रिसबूड, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ.डी.के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.ए.वाय. क्षीरसागर, मेडिकल ॲड. मिनिस्ट्रेटर डॉ.आर.जी. नानिवडेकर, अधिष्ठाता डॉ.एस.टी. मोहिते, डॉ. एन.डी. शशिकिरण, डॉ. वैशाली मोहिते, डॉ.एस्.सी. काळे, डॉ.जी. वरदराजुलू, डॉ.एस.आर. पाटील आदी. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृष्णा अभिमत विद्यापीठातून आज डॉक्टरची पदवी घेऊन अनेक विद्यार्थी बाहेर पडणार आहेत. त्यांनी आपण ज्या गावातून, समाजातून आलो; त्या गावाचे, समाजाचे काहीतरी देणे लागतो याचा विसर पडू देता कामा नये. स्पर्धात्मक युगात वावरत एकट्याची प्रगती साधताना आपल्या  समाजातील एखादा वर्ग पाठीमागे राहिल्यास आपल्या पुढे जाण्यालाही काही अर्थ उरत नाही, हेही सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, इथून बाहेर पडताना प्रत्येकांने भारतीय संविधानाने आपल्याला दिलेली समानता आणि त्यावर आधारित समाजरचना अस्तित्वात आणण्यासाठी आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे. परीक्षा येतात जातात, अनेक मेडलही मिळतात. परंतु, आपण केलेले चांगले कामच आपल्याला मोठे समाधान मिळवून देते; हेही विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणेवर भर देण्यात येत आहे. देशातील अडीच लाख प्राथमिक केंद्रांना विस्तारित करण्याची सरकारची योजना आहे. त्यामुळे येत्या काळात सुमारे २ लाख १३ हजार कोटींची गुंतवणूक आरोग्य क्षेत्रात होणार आहे. प्रत्येकाने काही वर्ष ग्रामीण भागातील लोकांची सेवा करून त्यांच्या आरोग्यासाठी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग केल्यास मोठे आत्मिक समाधान मिळेल. हे समाधानातून मिळालेली पदवी हीच आपली खरी पदवी असते, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.  
ना. डॉ. भागवत कराड म्हणाले, कृष्णा विद्यापीठाला डॉ. सुरेश भोसले यांच्यासारखे नेतृत्व लाभल्यामुळे या विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जा आणि गुणवत्ता सिद्ध केली आहे. कोरोना लसींच्या चाचण्यांमध्ये या विद्यापीठाने दिलेले योगदान देशासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. याकामी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांचे या विद्यापीठाला चांगले मार्गदर्शन लाभल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
कुलपती डॉ. सुरेश भोसले म्हणाले, स्वर्गीय जयवंतराव भोसले यांनी १९८२ साली कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली. ही सगळी समृद्धी कृष्णेच्या पाण्यातून आली आहे. त्यामुळे या समूहाने कृष्णा हे नाव धारण केले आहे. कोरोना काळात तब्बल ८ हजार रुग्णांना या संस्थेने कोरोनामुक्त करुन एक विक्रम प्रस्थापित केला. गेल्या चाळीस वर्षात पैसे नाहीत म्हणून या हॉस्पिटलमधून उपचार न घेता पाठीमागे गेला असा एकही रुग्ण नाही. स्वर्गीय आप्पासाहेबांनी घालून दिलेला हा जनसेवेचा आदर्श यापुढेही कायम ठेवणार आहे.
यावेळी विद्यापीठातर्फे कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री ना. मुरुगेश निराणी, तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी.लीट. पदवी बहाल करण्यात आली.
या समारंभात मेडिसिन अधिविभाग ४७६, नर्सिंग २९७, दंतविज्ञान १८४, फिजिओथेरपी १२८, अलाईड सायन्स अधिविभाग ८० आणि औषधनिर्माणशास्त्र ६२ अशा सहा अधिविभागातून एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बीएस्सी नर्सीग, एमएस्सी नर्सींग, एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी, एमएस्सी मायक्रोबायोलॉजी, बी फार्मसी आदी अभ्यासक्रमाच्या १२२७ विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली. झाराश्री साहू, किरण निकम, जयवंत थोरात, गितांजली पाटील, डॉ. मनिषा लद्दड, डॉ. गौरी शिंदे, शिवाजी पवार, आनंदी बांडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करुन गौरविण्यात आले.
प्रारंभी कुलगुरु डॉ. निलम मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कृष्णा मेडिकल कॉलेजच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे, कृष्णा विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे, फार्मसी व फिजिओथेरपी अधिविभागांच्या सुसज्ज इमारतींचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमास विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER