Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

लसीकरण आणि स्वॅब तपासणीवरून राजकारण तापले 

भादे सत्ताधारी आणि विरोधकांचे परस्पर विरोधी आरोप 
टीम : धैर्य टाईम्स
भादे येथे आज नियोजित कोरोना लसीकरण व स्वॅब तपासणी कॅम्प तालुक्यातील काही नेत्यांनी हस्तक्षेप करून श्रेयवादातून बंद पाडल्याचा दावा ग्रामपंचायतींच्या सत्ताधारी गटातील नेत्यांनी केला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही राजकारण झाले नसल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे. 

लोणंद : भादे येथे आज नियोजित कोरोना लसीकरण व स्वॅब तपासणी कॅम्प तालुक्यातील काही नेत्यांनी हस्तक्षेप करून श्रेयवादातून बंद पाडल्याचा दावा ग्रामपंचायतींच्या सत्ताधारी गटातील नेत्यांनी केला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही राजकारण झाले नसल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे. 

सध्या वाढत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर बाधीत लोकांचे वेळीच विलगीकरण व्हावे, यासाठी भादे येथे आरोग्य विभागाच्या वतीने स्वॅब तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी शिरवळ येथून टेस्ट किट उपलब्ध न झाल्यामुळे भादे ग्रामपंचायतींचे सरपंच सौ. निलांबरी बुनगे व उपसरपंच विशाल गायकवाड यांनी अहिरे येथील आरोग्य केंद्रातून पन्नास टेस्ट किट उपलब्ध केले. मात्र, सर्व तयारी झालेली असूनही आरोग्य कर्मचार्‍यांना ऐनवेळी फोन आला आणि कॅम्प सुरू ठेवण्यास वरिष्ठ पातळीवरील दबावामुळे आरोग्य कर्मचार्‍यांनी असमर्थता दर्शवली असल्याचा दावा भादे ग्रामपंचायतींच्या सत्ताधारी गटाने केला आहे. दरम्यान, याबाबत शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज वैद्यकिय अधिकारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून हा कॅम्प उद्या सकाळी म्हणजे मंगळवारी घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. 

राजकारणामुळे लोकांच्या
जीविताशी खेळ : सौ. निलांबरी बुनगे 

भादे गावच्या सरपंच सौ. निलांबरी बुनगे यांनी ग्रामपंचायत चांगले काम करत असताना विरोधक कोरोना काळातही राजकारण करत आहेत. तसेच हा भादे गावच्या लोकांच्या जीविताशी खेळ चाललेला आहे, असा आरोप विरोधकांवर केला आहे. 

आम्हा दोघांना बदनाम करण्याचा
प्रयत्न : यशवंत साळुंखे यांचा आरोप 

या आरोपांबाबत जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई साळुंखे यांचे पती यशवंत साळुंखे यांनी हा मला आणि माझ्या पत्नीला बदनाम करण्याचा सत्ताधारी गटाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच कोरोना सारख्या संकटाच्या काळात अशा प्रकारचे राजकारण कोणीही आणू नये. यावेळी आपली प्राथमिकता ही लोकांना मदत करण्याची असली पाहिजे. परंतु, सत्ताधार्‍यांकडून यावरूनही राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 

जि. प. सदस्या पराभवाचा सूड असा सूड
घेताहेत : विशाल गायकवाड 

काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई साळुंखे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलचा ग्रामविकास पॅनलने धुव्वा उडवत ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. या पराभवाचा जिल्हा परिषद सदस्या अशा प्रकारे सूड घेत आहेत, असा थेट आरोप भादे ग्रामपंचायतींचे उपसरपंच विशाल गायकवाड यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER