सातारा. दि 12: जिल्हा सैनिक कल्याण, सातारा यांच्या अखत्यारीत सैनिकी मुला/मुलींचे वसतिगृह सातारा व कराड येथे अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची आहेत. इच्छुक उमेदवारांनी दि. 27 जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सहायक वसतिगृह अधीक्षक व चौकीदार हे पद कराड येथील वसतिगृहात तर सफाई कामगार, माळी (पुरुष) व स्वयंपाकी (महिला) ही पदे सातारा व कराड या वसतिगृहात भरणार आहेत. माजी सैनिक, माजी सैनिक विधवांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
















