Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज दरडग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर, संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 20,  – जिल्ह्यात आज अखेर 247.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून हा पाऊस एकूण 20 टक्के इतका आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणी साठा आहे. कोयना- 32.21% (37.56 TMC), धोम  - 35.76 %, धोम बलकवडी - 72.22%, कण्हेर  - 28.99%, उरमोडी - 40.21%, तारळी    - 65.92%,  सर्व धरणातील एकूण पाणीसाठा टक्केवारी – 35.36%.

धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात  कोयनानगर -253 मि.मी., नवजा – 274 मि.मी., महाबळेश्वर – 334 मि.मी. पर्जन्याची नोंद झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने दरडप्रवण गावाकरिता संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा तालुक्यातील 41 धोकादायक गावांमध्ये व इतर संवेदनशील धोकादायक गावांची समक्ष स्थळपाहणी करुन या गावांमध्ये असणाऱ्या धोकादायक कुटुंबांची तात्पुरत्या स्वरुपाच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे आणि भोजन व शुध्द पेयजलासह निवाऱ्याची व्यवस्था करणे, संबंधित प्रशासकीय विभागाच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करुन घेणे इत्यादी अनुषंगिक कामकाज पार पाडणेसाठी संपर्क अधिकारी म्हणून पुढील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पाटण तालुक्यासाठी रामहरी भोसले, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 04. गावांची नावे - आंबेघर तर्फे मरळी खालचे, आंबेघर तर्फे मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहिर, दिक्षी, खुडुपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती), धनावडेवाडी/शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), जायगुडेवाडी, कुसावडे (पलसरी) व इतर संवेदनशील धोकादायक गावे.

महाबळेश्वर तालुक्यासाठी मनोहर गव्हाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सातारा. गावांची नावे - येरंडल, धावली, दुधोशी, भेकवली वाडी, आचली, कुमठे (कामठवाडी), येर्णे बु, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, येर्णे खुर्द, शिंदोळा व इतर संवेदनशील धोकादायक गावे.

वाई तालुक्यातील कोंढावळे, जोर व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी शिवाजी जगताप उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 02 यांची नियुक्ती केली आहे. तर जावली तालुक्यातील बोंडारवाडी, भूतेघर, वहिटे व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी सतिश धुमाळ, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 16 यांची नियुक्ती केली आहे.

सातारा तालुत्यातील सांडवली, केळवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी), मोरेवाडी व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

येवतेश्वर घाटात कोसळलेल्या दरडी तात्काळ हटवून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर घाटाईदेवी बायपास रस्त्यात दलदल झाल्याने रस्त्यावर खडी टाकून रस्ता पुर्ववत करण्यात आला आहे. तसेच महाबळेश्वर –तापोळा रस्ता (चिखली गाव), कराड- चिपळूण मार्ग कुंभार्ली घाट, प्रतापगड जवळ झांजवड गाव, महाबळेश्वर –पोलादपूर रस्त्याजवळ चिरेखिंडजवळ, कोळघर घाट कुसुंबी, चरेगाव-चाफळ डेरवण, दाडोली, चोपडी रस्ता, कुंभरोशी, कळमगाव, तापोळा, अहिररस्ता  या ठिकाणी अतिवृष्टीमूळे दरड कोसळून वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण झालेला होता. त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करुन सदयस्थितीत वाहतूक सर्व ठिकाणी सुरळीत चालू आहे. वाई-जांभळी, बलकवडी फाटा, गुळंब, जोर या रस्त्यावर भगदाड पडले होते त्या उपाययोजना करुन वाहतूक सुरु आहे.  

जिल्ह्यात तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात आली असून सध्या सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे 18, भैरवगड येथे 60 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांडवली येथे 20 नागरिकांचे स्थलांतर तंबूमध्ये करण्याचे काम सुरू आहे. जावळी तालुक्यात बोंडारवाडी येथे मंदिरामध्ये 6, भुतेघर जि.प. शाळा येथे 3 नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. वाई तालुक्यात जोर येथे वरची कोळी वस्ती येथे 8 आणि गोळेगाव – गोळेवस्ती येथील 4 नागरिकांचे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. पाटण तालुक्यात कोयना नगर वसाहत येथे मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील 150 नागरिकांचे तर म्हारवंड निवारा शेडमध्ये म्हारवंड गावातील 35 नागरिकांचे स्थलांतर केले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे येखील 65 नागरिकांनी नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. तसेच धोकादायक गावातील नागरिकांना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचेमार्फत सुरक्षित ठिकाणी अथवा नातेवाईकांचे घरी, शाळा, मंदिर येथे स्थलांतरित होणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER