फलटण प्रतिनिधी - माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यती जाधववाडी, फलटण येथे भरविण्यात आल्या असून या बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे तसेच गटातील प्रथम येणाऱ्याना आकर्षक अशी चांदीची गदा देण्यात येणार असल्याची माहिती विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली. ते धैर्य टाईम्सच्या प्रतिनिधीशी बोलत होते.
यावेळी बोलताना सरपंच सागर अभंग यांनी सांगितले की माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य बैलगाडा शर्यती सोमवार दि.11 मार्च रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 अशा होणार असून निकाल रेषा,अत्यंत पारदर्शक व ड्रोन तसेच पट्टी व इतर सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला असून ही स्पर्धा पारदर्शक व स्वच्छ वातावरणात पार पडणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्याना नाममात्र एक हजार पाचशे रुपये प्रवेश फी आकारली जाणार असून ती ऑनलाईन व ऑफलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या स्पर्धेतील पाहिले बक्षिस पाच लाख रुपये, दुसरे बक्षिस तीन लाख रुपये, तिसरे बक्षिस दोन लाख रुपये,चौथे बक्षिस एक लाख रुपये,पाचवे बक्षिस पंचाहत्तर हजार रुपये, सहावे बक्षिस पन्नास हजार रुपये व सातवे बक्षिस पंचवीस हजार रुपये रोख रक्कम स्वरूपात मिळणार असून या व्यतिरिक्त या स्पर्धेत सहभागी असणाऱ्या पशूंना चारा व पाणी मोफत दिले जाणार असल्याचे अभंग यांनी सांगितले.
दरम्यान ही भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धा ही अत्यंत पारदर्शक तसेच विविध ठिकाणी ड्रोन कॅमेरे,पूर्ण स्पर्धा यूट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे तर या स्पर्धेत झेंडा पंच म्हणून नामांकित असे धनावडे बापू,सोमनाथ जगदाळे,उपस्थित राहणार आहेत, समालोचन सुनील मोरे,मयूर तळेकर,विकास सर,प्रवीण घारे करणार असल्याचे सागर अभंग यांनी शेवटी सांगितले आहे.