सातारा दि.22- महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार महेश उभारे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार अनिल जाधव, सुभाष शिरसागर व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.