Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

महिला व बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

टीम : धैर्य टाईम्स

सातारा, दि. 24:  महिला व बालकांविषयी असणाऱ्या संरक्षण तसेच प्रतिबंधात्मक कायद्यांच्या निर्मिती मागचा हेतू लक्षात घेऊन त्यांची सर्वच संबंधित यंत्रणांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा काटकर, संरक्षण अधिकारी अजय सपकाळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख यांच्या विविध संस्थांचे अधीक्षक उपस्थित होते.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमांतर्गत येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचा जलद निपटारा करुन पिडीत महिलेला दिलासा देण्याचे काम जलद करावे, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले,  माहे ऑक्टोबर 24 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये प्राप्त 453 प्रकरणांपैकी 337 प्रकरणे फक्त समुपदेशाने निकाली काढलेली आहेत ही संख्या चांगली असून
समुपदेशन केंद्रांमध्ये  प्रकरणे जास्तीत जास्त समुपदेशाने कशी मिटतील यावर भर द्यावा.

महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कामकाजाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी पाटील यांनी भिक मागणे कायद्याने गुन्हा आहे.   जिल्ह्यात ज्या ठिकाणी भिक्षेकरी मोठ्या प्रमाणावर आढळतात अशी ठिकाणे निश्चित करून घालण्यात येणाऱ्या धाडींमध्ये सातत्य ठेवावे.  यासाठी मंदिर, गर्दीच्या ठिकाणी पोलीस व जिल्हा महिला व बाल विकास विभागाने वेळोवेळी धाडी टाकाव्यात. हरवलेल्या बालकांचा वापर भिक्षा मागण्यासाठी करण्यात येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे याबाबत संवेदनशील राहून लहान मुलांची यातून प्राधान्याने सुटका करावी, असे सांगितले. तसेच पोक्सो अंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. यामध्ये पिडीतांची ओळख उघड होणार नाही याचीही कोटोकरेपणे दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

जिल्ह्यात माहे ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये प्राप्त 71 अर्जांमधील 186 पिडीतांना भरपाई मंजूर झाली आहे. आतापर्यंत 85 लाख 55 हजार रुपयेचा निधी यामध्ये वितरित करण्यात आला आहे. तसेच एक कोटी बारा लाखाचा निधी मार्च अखेरपर्यंत वितरित करण्याची तजवीज ठेवण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. प्रलंबित अनाथ प्रमाणत्रे देण्याची कार्यवाही करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, शासकीय नोकरी व शिक्षणासाठी अनाथ मुलांना 1 टक्का राखीव कोटा असतो याची अंमलबजावणी होती का याकडेही लक्ष द्यावे. बाल संरक्षण समितीची स्थापना प्रत्येक ग्रामपंचायतीत होणे अनिवार्य आहे. ज्या ग्रामपंचायतींत या समितची स्थापना झालेली नाही अशा ग्रामपंचायतीमध्ये तातडीने समितीची स्थापना करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी बैठकीत दिले.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER