Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलची प्लास्टिक बंदीवर हिंदी पथनाट्याद्वारे प्रभावी जनजागृती

टीम : धैर्य टाईम्स

सातारा :देशात 1 जुलै 2022 पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. या
अंतर्गत दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू बंद केल्या जाणार
आहेत या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या
विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिक वस्तुओपर रोक’ हे हिंदी नुक्कड नाट्य तयार करून ३० जून रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज येथील कर्मवीर पुतळ्यासमोर, तसेच यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पोलीस चौकी रोड येथे त्याचे सादरीकरण करून जनजागृती केली. सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे, प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो. त्या वस्तूंचा एकदा वापर केल्यानंतर फेकून द्यायच्या असतात. जर या वस्तूंचा वापर सातत्यानं केला, तर मात्र त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. तसेच, यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचण्याचा धोका संभवतो.अशा प्रकारच्या वस्तू वापरण्यावर बंदी घालण्यात आल्याचे या नाटकात सांगण्यात येते .प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) ,प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक ,प्लास्टिकचे झेंडे  कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक थर्माकोल (पॉलिस्ट्रिन) ,प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास,चमचे, चाकू स्ट्रॉ ,ट्रे मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद ,इन्विटेशन कार्ड ,सिगरेटचं पॅकेट 100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी) या बंद करण्यात आल्याचे नाट्य संवादातून सांगितले जाते.. कोणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असेल, तर तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने 12 ऑगस्ट 2021 रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याचे नमूद करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर लगेच सावधान होत विद्यार्थी ,नागरिक,पालक सर्वाना जागरूक करनारे हे नाटक हिंदीत सादर केले जात असून कळेल अशा पद्धतीने अभिनय आणि संवाद विद्यार्थी करीत आहेत. या शाळेतील नववी वर्गातील विद्यार्थी समिधा भोकरे ,साक्षी शेलार ,जिया करपे ,आदिती कुलकर्णी,नेत्रा घाडगे ,वेदिका सोनटक्के ,सर्वेश भिडे,आदित्य घाडगे ,मानस पवार ,स्वरूप कांबळे ,वैभव पाटील हे विद्यार्थी आत्मविश्वासाने अभिनय करीत विषय उभा करीत आहेत .छत्रपती शिवाजी कॉलेजवर त्यांनी हे पथनाट्य उत्तम सादर केल्याबद्दल उपस्थित प्राध्यापक विद्यार्थी यांनी त्यांचे कौतुक केले. साताऱ्यात तसेच जिल्ह्यात कदाचित समयसूचकतेने व जाणीवेने केलेले हे विषयाशी सबंधित पहिलेच पथनाट्य असेल ज्याने व्यापक जनजागृती होईल,शासन व प्रशासन देखील या जागृती कार्याचे कौतुक करून सहकार्य करील’ असे मत छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. या पथनाट्यासाठी आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका लीना कदम,अनिता घाडगे,क्रीडा शिक्षक राहुल सावंत व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मेघा पवार व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. पथनाट्य सादरीकरण करतेवेळी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, उपप्राचार्य डॉ.रामराजेमाने देशमुख, प्रा.डॉ.सवितामेनकुदळे,प्रा.तानाजीदेवकुळे,डॉ.आर.पी.भोसले ,प्रा.डॉ.बाबासाहेब कांगुणे,प्रा.अभिमान निमसे,इत्यादी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER