सातारा, दि. 5 – सातारा जिल्हा माहिती अधिकारी पदी वर्षा पाटोळे या रुजू झाल्या आहेत. यापूर्वी त्या सांगली येथे जिल्हा माहिती अधिकारी पदी कार्यरत होत्या. यावेळी माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यापूर्वी त्यांनी कोल्हापूर, सांगली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्र येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक, तसेच मुंबई येथेही वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

















