सातारा दि.22 : महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियान अंतर्गत दिनांक 19 जून, 2023 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारामार्फत दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला व 59 विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली.
यावेळी डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा आणि संजीवनी राठोड, अधीक्षक, बालन्यायमंडळ व बालकल्याण समिती, सातारा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. साक्षी राणे, डॉ. श्रद्धा कदम, डॉ. प्रियांका बाबर यांनी डेंटल किट वाटप करुन दातांची निगा कशी राखावी याबद्दल माहिती दिली. यावेळी डॉ. योगेश गवळी, डॉ. शशांक जाधव, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
















