Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच

टीम : धैर्य टाईम्स
विधानभवनातील बैठकीत शिक्कामोर्तब ; माण - खटाव तालुक्यात जल्लोष

गेल्या काही महिन्यांपासून कळीचा मुद्दा ठरलेली मुंबई - बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरअंतर्गत पाच हजार हेक्टर क्षेत्रावर होणारी औद्योगिक वसाहत अखेर म्हसवड परिसरातच होण्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माण - खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला. दुष्काळी भागात एमआयडिसी होवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याने दोन्ही तालुक्यात जल्लोष करण्यात आला. 

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीला आ. जयकुमार गोरे , उद्योग विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव संजय देगावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, दत्ता मडकवार, राहुल भिंगारे, स्विय सहाय्यक संजय दिडवाघ, स्वीय सहाय्यक हितेंद्र पाटील, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि प्रांत ऑनलाईन तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विभागाचे अधिकारी आणि श्री. अरुण गोरे , श्री. निलेश माने उपस्थित होते.

सुरुवातीला सदर औद्योगिक वसाहत सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर म्हसवड - धुळदेव परिसरात मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत मोठे राजकारण घडले. म्हसवड परिसरात औद्योगिक वसाहतीला लागणारी जमीन उपलब्ध नाही, रस्ते नाहीत अशा अफवा उठवण्यात आल्या. राजकीय वजन वापरुन दिशाभूल करण्यात आली. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन तसा अहवालही वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला. सदर औद्योगिक वसाहत कोरेगाव तालुक्यात हलविण्याचा घाट घालण्यात आला. त्यानंतर काहींनी राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलने केली. अनेक महिने जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण होते. आता मात्र औद्योगिक वसाहत म्हसवड परिसरातच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादनाचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात हजारो कोटींची गुंतवणूक होवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याने जनतेने आनंदोत्सव साजरा केला. 

अपप्रवृत्तींना धडा शिकवून लढाई जिंकल्याचे समाधान : आ. जयकुमार गोरे 

ग्रीन कॉरिडॉरअंतर्गत म्हसवडला औद्योगिक वसाहत मंजूर झाली असतानाही विनाकारण संघर्ष करावा लागला. माण - खटावचा द्वेष करणाऱ्या रामराजेंनी एमआयडिसी इतरत्र नेण्याचे सर्व प्रयत्न केले. जनतेची दिशाभूल केली. अधिकाऱ्यांना इथली परिस्थिती प्रतिकूल असल्याचे चुकीचे रिपोर्ट द्यायला भाग पाडले. त्यांनीच एमआयडिसी पळवायचे आणि पुन्हा त्यांच्याच काही बगलबचांनी आंदोलन करायचे हा हास्यास्पद खेळही झाला. मी माझे प्रामाणिक प्रयत्न सोडले नाहीत. कुणालाही इथले साधे कस्पटही नेऊन देणार नाही, एमआयडिसी तर नाहीच नाही असा शब्द जनतेला दिला होता. इतके करुनही रामराजे आणि राष्ट्रवादीच्या बगलबचांना नेहमीप्रमाणे तोंडावर आपटावे लागले. आता या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होवून येथील हजारोंच्या हाताला काम आणि रोजगार उपलब्ध होईल. पाण्याच्या योजना पूर्णत्वाला जात असल्याने बागायती शेती, साखर कारखानदारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहे. ग्रीनफिल्ड हायवे मतदारसंघातून जात असल्याने आणखी आमूलाग्र बदल होवून आपण विकासाच्या नव्या उंचीवर जात आहोत अशी प्रतिक्रिया आ. जयकुमार गोरे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER