पँथर च्या माध्यमातुन डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ फलटण सह अन्य राज्यात उभी करण्याचे काम त्याकाळी तरूण वर्ग करीत होता आज रिपाईच्या माध्यमातुन आम्ही काम करीत आले सतत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेवुन सामाजिक राजकीय चळवळ केल्यामुळेच राज्य आणि केंद्रातील सत्तेची संधी मिळाली
दलित पँथर चळवळीतुन स्वर्गीय चंद्रकांत अहिवळे यांनी जय भिमचा नारा बुलंद करीत तालुक्यातील अन्याय अत्याचाराला चोख प्रतिउतर देत पँथर सक्षम केली. त्यामुळेच मला राजकीय ताकद मिळाली फलटणच्या राजकीय ताकदीमुळेच राजकीय सतेच्या संधी आपणास मिळाल्या असल्याचे सांगत फलटण ने राजकीय ताकद दिली नसती तर माझी देशभर ओळख झाली नसती असे भावुक उदगार केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी काढले.
चंद्रकांत अहिवळे यांचे नुकतेच निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर फलटण रिपाईच्या वतीने येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनासमोर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ना.आठवले बोलत होते.
यावेळी माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरोदे पाई पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा . शहाजी बापू कांबळे, अण्णा वायदंडे , सुनिल सर्व गोड अॅड . विजय ग०हाळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे , भाजपाचे तालुका अध्यक्ष पै.बजरंग गावडे उपस्थित होते.
पँथर च्या माध्यमातुन डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ फलटण सह अन्य राज्यात उभी करण्याचे काम त्याकाळी तरूण वर्ग करीत होता आज रिपाईच्या माध्यमातुन आम्ही काम करीत आले सतत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेवुन सामाजिक राजकीय चळवळ केल्यामुळेच राज्य आणि केंद्रातील सत्तेची संधी मिळाली या अशा सत्तांच्या माध्यमातुन सर्वसामान्यांचे काम होत आहे विविध शासकीय योजनां कार्यान्वीत केल्या जात आहेत त्यामुळे सामान्यांच्या विकासाला चालना मिळत असल्याचे ना. आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले
चंद्रकांत अहिवळे प्रशासकीय सेवेत होते तरी ते माझ्या संपर्कात होते ते विचारवंत होते अखेरपर्यंत मला त्यांनी सल्ला दिला , प्रेम दिलं त्याचा आदर्श घेवुन पुढील पिढीने समाजाचे काम करावे बाबासाहेबांचा विचार पुढे न्यावा सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या भावनांची कदर करणारी भारतीय संस्कृती जोपासावी असे आवाहनही ना. आठवले यांनी केले.
यावेळी सुभाष शिंदे, राजा सरोदे, सुनिल सर्वगोड, अण्णा वायदंडे, सातारा जिल्हा रिपाई अध्यक्ष अशोकराव गायकवाड, विजय गव्हाळे, बजरंग गावडे,शहाजी कांबळे आदिंनी आपले श्रद्धांजलीपर विचार व्यक्त केले. विजय येवले , मधुकर काकडे मुन्ना शेख , राजु मारूडा, अभिलाष काकडे दत्ता अहिवळे उपस्थित होते
प्रास्ताविक विजय येवले यांनी केले तर सुत्रसंचालन संजय निकाळजे यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांनी स्वर्गीय अहिवळे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शोकसभेस सामाजिक राजकीय क्षेत्रातील चळवळीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्मेने उपस्थित होते.