सातारा दि. 17 : जिल्हयातील ग्रामपंचायत पोट निवडणूक संबधाने दि. 18 मे 2023 रोजीचे मतदान व दि. 19 मे 2023 रोजीच्या मतमोजणी दिवशी पोलीस अधीक्षक समीर शेख, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार, असलेल्या अधिकाराचा वापर करुन, कायदा व सुव्यवस्थेचा बंदोबस्त कामी नेमलेल्या उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचेसह बंदोबस्तावरील अन्य पोलीस अधिकारी / अंमलदार यांना सातारा, कराड, वाई, खंडाळा, जावळी, फलटण व माण या तालुक्यातील संबंधीत गावातील त्या-त्या पोलीस ठाणे हद्यीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणुन वाहनांच्या नियमना संदर्भात, मिरवणुकीच्या मार्गासंबधाने, मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देणेचे अधिकार प्रदान केले आहेत.


















