सातारा दि. 19 : कोयना जलविद्युत प्रकल्पातील ज्या खातेदारांना अद्याप पर्यायी जमीन मिळाली नाही त्यांना कळविण्यात येते की, शासन निर्णय दि. 14 जून 2022 नुसार आपणास सातारा जिल्ह्यातील जमीन पसंत असेल तर आपण जिल्हाधिकारी सातारा यांचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या विहीत नमुन्यातील अर्जात सदर जमीन मिळणेबाबत जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयातील पुनर्वसन शाखेत तात्काळ जमीन मागणी अर्ज दाखल करावेत. सातारा जिल्ह्यातील उपलब्ध जमीनीची माहिती जिल्हाधिकारी सातारा यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व भूसंचयाची माहिती www.satara.gov.in (Notice-Announcement या ऑप्शनवर जावून) शोध घ्यावी.
ज्या मुळ प्रकल्पग्रस्त खातेदारांना अथवा त्यांच्या वारसांना यापूर्वी पुर्णत: जमीनीचे वाटप सातारा अथवा अन्य जिल्ह्यामध्ये झालेले आहे त्यांनी कृपया अर्ज दाखल करु नये. अशी बाब निर्दशनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
















