Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वाई येथे ९ ते १८ ऑगस्ट कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 9 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वाई येथे 9 ते 18 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत घरोघरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत,पंचायत समिती, नगरपालिका कार्यालयात ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ध्वज संहितेचे पालन करून  नागरिकांनी आपल्या घरावर ध्वज फडकवावे.

दि. ९ ऑगस्ट रोजी जांब येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार,किसन वीर स्मारक कवठे येथून प्रभात फेरीने वीर कुटुंबीयांच्या घरी भेट व कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. १० ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर महिला बचत गटांच्या मेळाव्याद्वारे महिलांची आर्थिक साक्षरता व ७५ बचत गटांना कर्ज वितरण व उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.याच दिवशी किकली येथे महिला व किशोरींसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीने महिला मेळावा निबंध,पाककला स्पर्धा  व व्याख्यान होणार आहे.

११ ऑगस्ट रोजी परखंदी येथे सैनिक माजी सैनिकांचा सत्कार व प्रभात फेरी कार्यक्रम होईल.बोपेगाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. दि.१२ ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर पंचायत समिती किसन वीर सभागृहात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.याच दिवशी कणूर येथील महिला ग्रामसभेत ९६ महिला विधवा प्रथेतून मुक्त होणार आहेत. केंजळ येथे स्तनपान सप्ताह, पूरक पोषक आहार प्रदर्शन व स्तनदा मातांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि.१३ ऑगस्ट रोजी वेळे ग्रामपंचायत व दानशूरांच्या सहकार्याने २०० मुलांची 'गोपाळांची पंगत' आयोजित करण्यात आली आहे. पंगतीत विद्यार्थ्यांना केळी, खजूर आदी पौष्टिक फळांचे वाटप करण्यात येणार आहे. खानापूर येथे वृक्षारोपण व पर्यावरण जागृती,भुईंज येथे किशोरी मेळाव्यात आहार आरोग्य व शारीरिक बदलांविषयी मार्गदर्शन आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे.सकाळी ७५ शिक्षक सायकल रॅलीने खानापूर येथे जाऊन वृक्षारोपण करणार आहे.

दि.१४ ऑगस्ट रोजी पसरणी येथून पर्यावरण जागृती सायकल रॅली वाई व पुन्हा पसरणी येथे जाईल.  दि.१५ ऑगस्ट रोजी तालुकास्तर रांगोळी व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उडतरे येथे ७५ ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे. याच दिवशी दरेवाडी गावातील महिला १०० टक्के कचरामुक्त गाव व घनकचरा,सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम स्वयंप्रेरणेने राबविणार आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १७ ऑगस्ट रोजी पंचायत समिती,वाई येथे करण्यात येणार आहे.देशभक्त किसन वीर यांच्या जयंतीदिनी अमृत महोत्सव कार्यक्रमांची सांगता किसन वीर यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यप्रवेशांचे सादरीकरणाने व बक्षीस वितरण समारंभाने होईल, या कार्यक्रमास आमदार मकरंद पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

चांदवडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होणार विविध उपक्रमांनी साजरा

   स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त   चांदवडी येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत   दहा दिवस  विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये कृषी मेळावा, महिला मेळावा, किशोरी मेळावा, सायकल रॅली, वृक्षारोपण, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गोपाळ पंगत, शालेय स्पर्धा यासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

  आरोग्य विषयक जनजागृती

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ग्रामपंचायत कण्हेर ( ता जि सातारा) येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत नियोजन चर्चा व ठराव करण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामसभेत आलेल्या सदस्यांना व नागरिकांना आरोग्य विषयक माहीती दिली. तसेच  पांचगणी उपकेंद्र:- भिलार अंतर्गत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली तेव्हा आरोग्य विषयक माहिती देण्यात आली . संसर्ग्यजन्य, असंसर्गजन्य आजारांबाबत माहिती .उपकेंद्र विसापूर ता. खटाव येथे विशेष ग्रामसभे मध्ये   नागरीकांना कोव्हीड लसीकरण बुस्टर डोस तसेच NCD तपासणी शिबीर,  महिलांसाठी आरोग्य शिबीर इ.विषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच उपकेंद्र कटगुण येथे विशेष ग्रामसभे मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सविता वाघ यांनी नागरीकांना कोव्हीड लसीकरण बुस्टर डोस तसेच NCD तपासणी शिबीर, H b तपासणी , महिलांसाठी आरोग्य शिबीर इ.विषयी सविस्तर माहिती दिली त्यावेळी उपकेंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

लोणंद येथे वृक्षारोपण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वनपरिक्षेत्र- खंडाळा वनपरिमंड -लोणंद व श्री भैरवनाथ डोंगर ग्रुप, लोणंद यांचे संयुक्त विद्यमाने आज रोजी मौजे लोणंद वनक्षेत्रातील भैरवनाथ मंदिर परिसरात सिताफळ ,चिंच रोपे लागवड करण्यात आली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER