फलटण प्रतिनिधी - महाराष्ट्रात धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढपाळ व्यवसाय करत असून ते पशुपालक आहेत. १९५६ च्या एस. टी. यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगर अशी नोंद आहे. मात्र देवनागरी लिपीत इंग्रजीमधून धनगरचे स्पेलिंग Dhangar याऐवजी Dhangad असे लिहिले आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ घेवून गेल्या ६८ वर्षापासून धनगर समाजाला एस. टी. आरक्षणापासून वंचीत ठेवले आहे. त्यामुळे राज्यसरकारने तातडीचे अधिवेशन बोलवून या अधिवेशनामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही विनंती करणारे पत्र आज दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी लिहले गेले आहे. या पत्रात पुढे असे. म्हटले आहे की, राज्यात धनगड नावाची जमात कुठेच अस्तित्वात नाही.
तरी राज्य सरकारने तात्काळ धनगर समाजाच्या या न्याय मागणीचा विचार करुन त्यांच्या हक्काचे अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा तात्काळ जी. आर. काढून धनगर समाजाला अनुसुचित जमातीची सवलत लागु करावी. वेळ पडली तर राज्यसरकारने तातडीचे अधिवेशन बोलवून या अधिवेशनामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही विनंती.