सातारा दि. 8 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने 7 डिसेंबर 2022 रोजी ध्वजदिन-2022 निधी संकलनाचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी वीर पत्नी व वीर माता यांचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तके वाटप करुन सन्मान करण्यात आला. तसचे उपस्थित गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील शहीदांच्या वीर पत्नी, वीर माता, माजी सैनिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
00000

















