Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा  प्रशासनाला  इशारा : सातारा येथे पत्रकार परिषद
टीम : धैर्य टाईम्स
फलटण व माण तालुक्यात  करोना उपचारासाठी जंबो हॉस्पिटल  होण्यासाठी सूचना केली आहे. त्यासाठी पाच दिवसात इ-टेंडर नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पाठपुरावा करण्याचे आदेश पवार यांनी देत मनुष्यबळ आणि सुविधा देत आहोत त्यामुळे कामाचा रिझल्ट दिसलाच पाहिजे अन्यथा कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

सातारा : फलटण व माण तालुक्यात  करोना उपचारासाठी जंबो हॉस्पिटल  होण्यासाठी सूचना केली आहे. त्यासाठी पाच दिवसात इ-टेंडर नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पाठपुरावा करण्याचे आदेश पवार यांनी देत मनुष्यबळ आणि सुविधा देत आहोत त्यामुळे कामाचा रिझल्ट दिसलाच पाहिजे अन्यथा कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान खाजगी व शासकीय दवाखान्यांनी इलेक्ट्रीकल फायर ऑडिट करून घ्या, अशा सक्त सुचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील करोना संक्रमणाची परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर अजितदादा पवार येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सातारा जिल्हा करोना संक्रमणाच्या यादीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे हा संसर्ग आटोक्यात आणायचा तर सातारकरांना कठोर नियम पाळावेच लागतील . घरातच सुरक्षित रहा जे विनाकारण रस्त्यावर येतील त्यांची गय केली जाणार नाही. अशा स्पष्ट कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत सातारकरांना दिल्या. विनाकारण पोलिसांना कारवाई करण्यासाठी कठोर व्हायला लावू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले 

 ते पुढे म्हणाले, राज्यात 18 जिल्हे सर्वाधिक पॉझिटिव्ह आहेत. त्यात सातारा आघाडीवर आहे. त्यानुसार साताऱ्याला आलो आहे. वाढती संख्या रोखण्यावर काय उपाय करायचे यावर चर्चा झाली आहे. प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढला, निधी उपलब्ध केला आहे. तिसरी लाट आली तरी काय पावले उचलायची याबाबत सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेला 35 रुग्णावाहिकांचा प्रस्ताव देणार आहे. राज्याने ज्या रूग्णवाहिकांची जी खरेदी केली आहे त्यातील पाच रूग्णवाहिका तत्काळ येथील रुग्णसेवेत दाखल होणार आहेत.

रेमडिसिव्हर इंजेक्‍शन  भरपूर प्रमाणात उपलबध केले आहे. परंतु, म्युकरमायकोसिसचा आजार नवीन आहे. अनुभवातून शिकतो आहे. माहिती घेतली जात आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याच्या अंमलबजामुळे सातारकारांनी वाईट वाटून घेऊ नका. करोना रोखण्यासाठी सगळ्यांना नियमांचे पालन करण्यासाठी सहभागी व्हावे लागेल. नियम डावलणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. तशी वेळ पोलिसांवर आणू नये. प्रशासनाला कुठली अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमध्ये आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे. जनतेने नियमाने वागले पाहिजे. अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन सातारकरांनी  केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाबाबत आपण समाधानी आहात का असे विचारले असता अजितदादा म्हणाले की मला याच टीमकडून टीमकडून काम करून घ्यायचे आहे त्यांना नाउमेद करणार नाही. परंतु ज्या काही सूचना त्यांना द्यावयाचे आहेत त्या दिलेल्या आहेत. मंत्रालय पातळीवरून आवश्यक त्या सुविधा प्रशासनाला उपलब्ध करून देत आहोत. तरीही अधिकाऱ्यांकडून काही हलगर्जीपणा तर संबंधित अधिकाऱ्यांची कोणतीही हाय न करता कारवाई करणार आहे अशा स्पष्ट सूचना अजितदादा यांनी दिल्या.

मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर 
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे राज्य सरकारला स्वतंत्र मार्ग अवलंबिण्याचा इशारा दिला आहे या प्रश्नावर बोलताना अजितदादा म्हणाले, संभाजीराजे हे जवाबदार नेतृत्व आहे, त्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याचा जो इशारा त्यांनी दिला त्याबद्दल मला माहित नाही. पण मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाआघाडी सरकार पुरते गंभीर आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली वकिलांची स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या सातत्याने बैठका सुरू असून या बैठकांचे अहवाल सातत्याने राज्यसरकार अवलोकन करत आहे. महाविकास आघाडीचे  प्रमुख मंत्री या प्रश्नावर पुन्हा राज्यपालांना भेटणार असल्याचे अजितदादांनी सांगितले.

  • - अजितदादा म्हणाले ...
  • जादा ऑक्सीजन प्लॅंन्टसाठी १५ जुलैची मुदत
  • डीपीसीतून जिल्हयांना 3300 कोटीचा निधी
  • 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 6500 कोटीची तरतूद
  • 60 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची जवाबदारी केंद्राची
  • पहिल्या टप्प्यात संस्थात्मक विलगीकरण ग्रामीण भागात
  • पीएम केअरच्या व्हेंटिलेटर दुरूस्तीसाठी आयुक्तांकडे तंत्रज्ञ मागा
  • कराडच्या बंद सीटी स्कॅन मशीनची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश
  • भारत बायोटेक व सिरमसह हाफकिन इन्स्टिट्यूटलाही लस निर्मितीची परवानगी

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER