फलटण प्रतिनिधि :
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 192 व्या पुण्यतिथीनिमित्त फलटण येथे उमाजी नाईक चौक या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे - पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार फंडातून दहा लाख रुपयांचा निधी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी देण्याचे जाहिर केले.
भारतीय जनता पक्षाचे फलटण कोरेगाव - विधानसभेचे प्रमुख सचिन कांबळे - पाटील, भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे उपस्थित होते. यावेळी रामोशी समाज संघटनेच्या वतीने राजभाऊ मदने, शिवाजीराव जाधव डॉ.सुभाष गुळवे बाळासाहेब मदने, नानासाहेब आडके, सनी मदने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शत्रूघ्न जाधव यांनी केले व आभार डॉ. सुभाष गुळवे यांनी मानले. भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.