Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

डीजे व फटाकामुक्त जयंतीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होणार नाही ; पिंपरद येथील आंबेडकर जयंती मंडळाचा स्तुत्य उपक्रम : स.पो.नि.शिवाजी जायपात्रे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी- 


डीजेवर दारू पिऊन नाचणारी मुले कोणत्याही पालकांना आवडत नाहीत. मात्र महापुरुषांचे विचार रुजवणारी जयंती सर्वांनाच आवडते पिंपरदच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाने निवडलेला डीजे व फटाकामुक्त जयंतीचा निर्णय हा सर्वोत्तम आहे. अशा प्रकारे सर्वच महापुरुषांच्या जयंती साजरी झाल्या तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होणार नसल्याचे स.पो.नि.शिवाजी जायपात्रे म्हणाले. ते पिंपरद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळाच्या "भीम जयंती 2025" च्या नियोजन बैठकीत बोलत होते. 

यावेळी जनार्दन भगत हायस्कूल कमिटी अध्यक्ष, जेष्ठ नेते बाळासाहेब कापसे, अनिल ढमाळ मा. उपसरपंच, विकास ढमाळ ग्रामपंचायत सदस्य, सुनील बोराटे पोलीस पाटील, शिवाजीराव सुतार, अध्यक्ष फलटण तालुका सुतार समाज संघटना, संजय लालगे, शरद मोरे, मंडळाचे सल्लागार सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना स.पो.नि.शिवाजी जायपात्रे म्हणाले, अनेक गावांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे त्यामुळे जाती - धर्मामध्ये तेढ निर्माण होत आहे. श्रेयवादाची लढाईची सुरुवात ही महापुरुषांच्या जयंती पासूनच सुरु होते. श्रेयवादाच्या लढायातून डीजे संस्कृती पुढे आली आहे. एखाद्या महापुरुषाच्या जयंतीला डीजे फटाके वाजले की अन्य महापुरुषांच्या जयंतीला सुद्धा त्यापेक्षा जास्त फटाके, डीजे वाजवला जातो त्यावेळी समाजामध्ये तेढ निर्माण होतो असे जायपात्रे म्हणाले. 


प्रत्येक जाती धर्मातील लोकांना आपापले महापुरुष प्रिय असतात आणि ते असलेही पाहिजेत. परंतु इतर महापुरुषांचे विचार सुद्धा सर्व समाजासाठी आहेत हा विचार आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत महापुरुषांची जयंती सर्व समावेशक होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सर्व जाती धर्मासाठी आहे ते देशांमध्ये नव्हे तर जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. सर्व जाती-धर्मांनी विचार केला की बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधान हे आपल्यासाठी आहे त्यावेळी त्यांची जयंती सर्वसामावेशक होईल आणि दुसऱ्या धर्मातील लोकही सहकार्य करतील असा आशावाद यावेळी जायपात्रे यांनी व्यक्त केला. 


जयंती साजरी करताना कर्ण कर्कश डीजे, लेझर लाईट यामुळे जेष्ठ नागरिक यांना त्रास होणार काही दारू पिऊन नाचणार अश्लील हातवारे करणार त्यामुळे इतर समाजातील सुज्ञ नागरिक अशा प्रकारच्या जयंती पासून दूर राहतात. परंतु पिंपरद सारखी पारंपरिक पद्धतीची जयंती साजरी झाल्याने विविध जाती धर्मातील लोकांना सुद्धा अशा जयंती मध्ये सहभागी व्हावेसे वाटते असे गौरवोद्गार जायपात्रे यांनी काढले. तर पिंपरद सारख्या पारंपारिक जयंतीची सर्व ठिकाणी होणे गरजेचे असल्याचेही यावेळी जायपात्रे यांनी निदर्शनास आणून दिले. 


बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती- धर्मातील महिलांना चार भिंतीच्या बाहेर आणून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम केले आहे हे आजही अनेक महिलांना माहिती नसल्याची खंत जायपात्रे यांनी व्यक्त करुन जयंती मंडळानी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे काम सर्व समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. 

 

सामाजिक उपक्रम राबवत असताना केवळ एकजाती धर्मासाठी न राबवता तो व्यापक स्वरूपात राबवला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी शिवाजी जायपत्रे यांनी व्यक्त केली. जयंती मंडळानी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे शेवटी सांगितले.

प्रस्ताविकामध्ये सचिन मोरे यांनी डीजे व फटाकेमुक्त जयंती बरोबरच पारंपरिक वाद्य व पारंपरिक खेळ हे या वर्षीच्या जयंतीचे प्रमुख आकर्षण असणार असल्याचे सांगितले. 

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 


यावेळी जनार्दन भगत, अनिल ढमाळ यांनी आपले विचार व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत निरज मोरे, विकास मोरे, विक्रांत मोरे, अमित खुडे, संतोष मोहिते, बापूराव मोरे,दयानंद मोरे, विजय बनसोडे यांनी केले.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER