Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

पालखी मार्गावरील समस्या सोडवण्यास प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 18,  – पालखी मार्गावरील समस्या तसेच अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी आषाढी वारी व पालखी मार्ग याविषयी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, वाई – खंडाळाचे प्रांताधिकारी, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, पोलीस उपअधिक्षक के. एन. पाटील, खंडाळा तहसिलदार अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटणचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोरडे, खंडाळाचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, लोणंदचे मुख्याधिकारी दत्तात्रेय गायकवाड, नगर प्रशासनचे प्रशासकीय अधिकारी सचिन सणस, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजचे अध्यक्ष भाऊसाहेब मनोहरबुवा गोसावी, उपाध्यक्ष भाऊ महाराज फुरसुंगीकर, सचिव मारुती कोकाटे, ॲड. विकास ढगे पाटील, आळंदी मंदिरचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,  यांच्यासह देवाची आळंदी येथील मानकरी व वारकरी उपस्थित होते.

            पालखी तळाच्या ठिकाणासाठीच्या नवीन जागांसाठीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, ज्याठिकाणी जागा उपलब्ध नाहीत तेथे सर्वेक्षण करावे. मे पर्यंत रस्त्यांची व पुलांची कामे पूर्ण करावीत. लोणंद येथे पूल रूंदीकरण करावे. लोणंद, फलटण, वाखरी येथे तळाची जागा वाढवण्यासाठीचे प्रस्ताव तयार करावेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी वॉटर एटीएम बसवण्याविषयी सर्वेक्षण व्हावे. पालखी मार्गावर दोन्ही बाजूने वृक्षारोपण करावे. तात्पुरत्या कचरा कुंड्या उभाराव्यात. तर शहरीभागामध्ये संबंधित नगर पालिकांनी कायमस्वरुपी कचरा कुंड्या उभा कराव्यात. विसाव्याच्या ठिकाणी चांगली सावली देणारी झाडे लावावीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने रस्त्याबाबत येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या स्तरावर काम करावे. पालखी मार्गावर स्वच्छता राहील यासाठी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नियोजन करावे असेही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सांगितले.

            पालखी काळात येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर आतापासूनच उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा मानस असून त्यासाठीच बैठकीमध्ये समस्या जाणून घेत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सोहळा समिती, वारकरी संप्रदाय यांनीही प्रशासनाच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा. सर्वांनी मिळून वारी स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी व आनंदी वातावरणात पार पडेल यासाठी काम करुया.

            यावेळी सोहळा समितीचे पदाधिकारी, वारकरी यांनी वारी सोहळ्यात येणाऱ्या समस्यांची माहिती दिली. यासर्व  समस्यांवर तातडीने कार्यावारी सुरू करून याविषयी दर महा बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER