सातारा. दि 12 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मा उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला ज. धोटे,अध्यक्षा,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सातारा आयोजित आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दि.12 जून23 रोजी जागतिक बाल कामगार विरोधी दिन आणि मुलांचे विविध हक्क या विषयी जन जागृती शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती नलवडे यांनी केले. त्या नंतर जागतिक बाल कामगार विरोधी दिन या विषयी ॲड.मनिषा बर्गे यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी या कायद्यामध्ये कोणती मुले येतात व किती वयाच्या मुलांना कामगार म्हणून ठेवता येणार नाही किंवा ठेवता येते. तसेच अशा मुलांना कोणती कामे देता येतील व किती तास त्यांना काम करावे लागेल या विषयीचे नियम कोणती कामे देता येतील व किती तास त्यांना काम करावे लागेल या विषयीचे नियम सांगितले. तसेच या कायद्याचे उल्लंधन केल्यास त्यासाठी असणारी शिक्षा याची सखोल माहिती दिली. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले.
मुलांचे विविध हक्क या विषयी एस. डी. सावरकर यांनी मुलांना संविधानाने तसेच इतर कायद्यान्वये कोणते हक्क दिले आहेत याची सविस्तर माहिती दिली. तसेच मुलांना त्यांचे हक्क नाकारल्यास कायद्याने काय शिक्षा आहे व त्याचे त्या मुलांवर काय परिणाम होतात हे सांगितले.
















