राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या बेमुदत संप आंदोलनांतर्गत गुरुवारी 25 रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी साकडे घालत एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला सुद्बुध्दी देण्यासाठी प्रार्थना केली.
कराड : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या बेमुदत संप आंदोलनांतर्गत गुरुवारी 25 रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी साकडे घालत एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला सुद्बुध्दी देण्यासाठी प्रार्थना केली.
येथील बसस्थानकासमोर विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून बेमुदत संप व धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनांतर्गंत गुरुवारी स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी असल्याने एसटी कर्मचारी स्व. चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी समाधीवर पुष्पचक्र अर्पण केले. तसेच एसटी महामंडळाचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, यासाठी स्व. चव्हाण साहेबांना साकडेही घातले.
त्याचबरोबर लवकरात लवकर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी सरकारला सुद्बुध्दी देण्याची प्रार्थना केली. दरम्यान, जोपर्यंत एसटी महामंडळाचे विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी शपथही कर्मचाऱ्यांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी घेतली आहे.