सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व हिंगणगाव येथील माजी सोसायटी सदस्य अनिल भोईटे सर यांनी भारतीय जनता पक्षांमध्ये माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षांमध्ये फलटण तालुक्यात जोरदार इनकमिंग सुरु आहे. हिंगणगाव येथील अनिल भोईटे सर यांच्या प्रवेशाने महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांना मोठे पाठबळ मिळणार आहे. यावेळी राजेंद्र काकडे व विक्रांत झणझणे उपस्थित होते.