फलटण प्रतिनिधी : कृषी उपत्न बाजार समिती शेतकऱ्यांना विविध सेवा, सुविधा उपलब्ध करुन देवू शकते याचा नवा आदर्श फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने कामकाजाचा आदर्श अन्य बाजार समित्यांसमोर ठेवला असल्याचे आ. दीपक चव्हाण यांनी सागितले.
भाडळी बु., ता. फलटण येथील फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित पेट्रोल पंपाचे उद्घाटन आ. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर होते. यावेळी जयभवानी एज्युकेशन सोसायटी, तिरकवाडी अध्यक्ष आनंदराव शितोळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर विभाग उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, हेमंत बोरावके, सचिन रणवरे, गुलाबराव डांगे, मातोश्री विकास सोसायटी चेअरमन मोहनराव डांगे, पोलिस पाटील संघटनेचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर पाटील, शिरीष सोनवलकर, सुदाम शिंदे, महेश सोनवलकर, हणमंत दत्तात्रय सोनवलकर पाटील, सुभेदार डूबल गुरुजी, लक्ष्मण मुळीक, अशोक गुंजवटे, सतीश चव्हाण, धनंजय मोरे, पै. संजय देशमुख, अक्षय मुळीक वसंतराव मुळीक, काशीनाथ मुळीक, सचिन शिरतोडे, हणमंत शिरतोडे, अशोक माने, वसंत डांगे, संजय डांगे, श्रीमंत डांगे, स्वप्नील शेंडे, महादेव डांगे, सीताराम सोनवलकर, महेश ढवळे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्वश्री ज्ञानदेव गावडे, टी. डी. शिंदे, संतोष जगताप, प्रविण खताळ, संजय कदम, समर जाधव, शंभूराज पाटील, सचिन लोखंडे, अक्षय गायकवाड, जयश्री सस्ते, सुनिता रणवरे, चांगदेवराव खरात, निलेश कापसे, दीपक गौंड, उपस्थित होते.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकूण १२ पेट्रोल पंप सुरू होणार असून त्यापैकी 3 पंप सुरु झाले असल्याचे आज चौथ्या पंपाचे उद्घाटन झाले असल्याचे आ. दीपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. या कार्यक्रम प्रसंगी भगवानराव होळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत तसेच मान्यवरांचे सत्कार केले तर मुख्य मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केली तर बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी प्रास्ताविकात बाजार समितीच्या राबविलेल्या विविध योजनांविषयी माहिती दिली. प्रमोद रणवरे यांनी सूत्रसंचालन आणि समारोप व आभार प्रदर्शन मोहनराव डांगे यांनी केले. यावेळी मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.