कराड येथे आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या कराड केंद्राकडून यापूर्वीच निषेध व्यक्त करुन लोकप्रतिनिधीना निवेदनही दिली आहेत. आता या घटनेची गंभीर दखल दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या महाराष्ट्र विभागाने घेतली असून उद्या गुरुवारी 25 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील आर्किटेक्टस दिवसभर काळी फीत बांधून या हल्ल्याचा निषेध करणार आहेत.
कराड : कराड येथे आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आज गुरुवारी 25 रोजी राज्यभरातील आर्किटेक्टस दिवसभर काळी फीत बांधून निषेध करणार असल्याची माहिती कराड उपकेंद्राचे अध्यक्ष आर्किटेक्ट सारंग बेलापुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कराड येथे आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या कराड केंद्राकडून यापूर्वीच निषेध व्यक्त करुन लोकप्रतिनिधीना निवेदनही दिली आहेत. आता या घटनेची गंभीर दखल दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या महाराष्ट्र विभागाने घेतली असून उद्या गुरुवारी 25 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील आर्किटेक्टस दिवसभर काळी फीत बांधून या हल्ल्याचा निषेध करणार आहेत.
तसेच कराड उपकेंद्राचे खजिनदार आर्किटेक्ट जिंतेंद्र भंडारी यांच्याबाबत घडलेल्या धक्कादायक घटनेची शासनासह समाजानेही गंभीर दखल घ्यावी. तसेच अशा घटना पुन्हा कोणत्याही व्यवसायिकासोबत घडू नयेत, यासाठी देशभरातील आर्किटेक्टची संस्था असलेल्या दि इंडियन इन्स्टियूट आॅफ आर्किटेक्टसच्या महाराष्ट्र विभागाने आता पुढाकार घेतला आहे. इथून पुढे कोणत्याही बांधकाम परवानगी प्रस्तावासोबत आर्किटेक्टचे नेमणूक पत्र असणे अनिवार्य करण्यात यावे. तसेच एक आर्किटेक्ट करत असलेले काम अन्य आर्किटेक्टला त्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हाती घेता येणार नाही. या 'कोड ऑफ कंडक्ट'ची सक्त अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तशी निवेदनेही आर्किटेक्टस तर्फे राज्यभरातील संबंधित अधिकारी यांना सादर करण्यात येणार अडल्याचेही सदर प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.