फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा व काही काळ नगर परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी डॉ.मक्सिन बर्नसन व डॉ.मंजिरी निंबकर यांच्या मार्गदरशनाखाली विविध प्रकल्प राबवत आहेत.
सोमनाथ घोरपडे सामाजिक,धार्मिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे व्यक्तीमत्व. आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, शोषित, वंचित समाजातील व्यक्तींच्या जिवन कार्याबद्दल लेखन करून त्यांचे जीवन कार्य समाजासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे लेखक,
फुले,शाहू आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी पुरोगामी विचारांचा समर्थ वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार वक्ते.
सासकल सारख्या छोट्याशा गावात सोमनाथ घोरपडे यांचे कुटुंब प्रामाणिकपणे समाजाची सेवा करत आहे.यात त्यांना त्यांचे मोठे वडील बंधू किरण घोरपडे यांची समर्थ साथ असते.
समाजकार्याची पदवी घेतलेल्या घोरपडे सरांनी समाजाच्या प्रश्नांबद्दल कायम आवाज उठवला आहे.श्रीमंत संजिवराजे ना.निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात.
प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवन शाळेत त्यांनी शिक्षण विस्तार कार्यकर्ता ते प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पद भूषविले असून सध्या लातूर जिह्यातील औसा तालुक्यात सुरू असणाऱ्या शैक्षणिक प्रकल्पावर प्रकल्प अधिकारी म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. ते प्रगत शिक्षण संस्थेत गेली २२ वर्षे शैक्षणिक काम करत असून फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा व काही काळ नगर परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी डॉ.मक्सिन बर्नसन व डॉ.मंजिरी निंबकर यांच्या मार्गदरशनाखाली विविध प्रकल्प राबवत आहेत.
कायम अनेक विषयांवर त्यांनी विविध वृत्तपत्रात लेखन केले आहे आणि करत आहेत.त्यांनी फलटणच्या चळवळीवर संशोधात्मक लेखन केले असून ते लवकरच प्रकाशित होईल.त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्यावर प्रकाश टाकणारे मुक्तिदाता नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.त्यांना उत्कृष्ट निबंधासाठी डॉ. अ.रा कुलकर्णी यांच्या नावाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.तसेच गेल्या ५ महिन्यापूर्वी राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन श्री. वामन मेश्राम यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे.धार्मिक क्षेत्रात भारतीय बौध्द महासभेचे ते श्रमणेर व बौद्धचार्य असून त्यांनी सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष पद ही भुषवले आहे.
गावच्या राजकीय क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.ते तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात ही कायम सक्रिय असतात.अतिशय परखड व विश्लेषण करणारे मुत्सद्दी राजकारणी म्हणून ही त्यांची ख्याती आहे.
सध्या सासकल जन आंदोलन समितीचे प्रवक्ते म्हणून ते गावातील अवैध धंदे बंद करणे, गौण खनिजांची लूट थांबवणे.गावाचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी विविध आंदोलने करत आहेत.त्यांनी भ्रष्ट राजकारण्यांना वठणीवर आणण्याचे काम केले आहे.
अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला माझ्या व माझ्या परिवाराच्या, धैर्य टाईम च्या वतीने व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा!त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडत राहो.त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा