Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा

जातीयवादाचे विष सर्वांनी एकत्र येऊन मातीत गाढा : खा. रणजितसिंह यांचे आवाहन

टीम : धैर्य टाईम्स
देशातील विविध महापुरुषांनी भारतीय म्हणून काम केले मात्र देशातील विविध जाती समूहांनी त्यांना जाती बंदिस्त केले. आजही विविध जाती समुहाच्या बैठक होताना दिसतात या सर्व घडामोडी देशाची एकता भंग करणाऱ्या आहेत जातीयवादाचे चित्र अलीकडे गडद होताना दिसत आहे. त्यामुळे जातीयवादाचे विष सर्वांनी एकत्र येऊन मातीत गाढा असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले, ते फलटण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.नरसिंह निकम, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे मा. पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सुशांत निंबाळकर, अमोल सस्ते, प्रा.रवींद्र कोकरे, महिला आघाडीच्या सौ उषा राऊत, जिल्हा सरचिटणीस सौ. मुक्ती राहुल शहा, माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 पुढे बोलताना खा. रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर अस्पृश्यता मिटवणारे व विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे सावरकर यांच्यावर काही लोक टिका करतात मात्र त्यांनी पहिल्यांदा अभ्यास करावा व नंतर बोलावे. अलीकडच्या काळामध्ये विविध समाजामध्ये गट निर्माण व्हायला लागले आहेत त्याचा परिणाम समाज दुभंगतेकडे होऊ लागला असून कोणत्याही धर्माने जातीवाद शिकवला नाही विविध जाती,धर्म,पंथ देशात गुण्या गोविंदाणे नांदले पाहिजेत अशी अपेक्षा खा. रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केली.

कोणत्याही घटकाने जातीयवाद मुळात माणूच नये यातून भारतीयांचे एकीकरण होण्यास मदतच होणार आहे. विविध समाजातील वाद देशाची एकता व अखंडतेला मारक असल्याचे प्रतिपादन खा. निंबाळकर यांनी केले. समाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्याला बाजूला ठेवणे ही आजची गरज बनली आहे. विविध जाती समूहाच्या मागे राहून राजकीय स्वार्थ साधनाऱ्या राज्यकर्त्यांनी जातीयवाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी खासदार निंबाळकर यांनी केले.

सध्या देशात भाजपाचे सरकार आहे. आपण आपल्या भागात अनेक कोटींचा निधी आणला आहे. विविध समाजातील घटकांना याचा लाभ होतो. विकास प्रक्रियेमध्ये कोणताही समाज मध्ये न आणता सर्वांगीण विकास ही आपली मनापासूनची धारणा असून केंद्राच्या माध्यमातून आपल्या भागासाठी रोज कोठ्यावधींचा निधी येत आहे. सर्वांचा विकास हाच आपला ध्यास असल्याचा संकल्प आपण केला असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले. आज समाजातील विविध घटक आपली ओळख करून देत असताना मी या जातीचा मी त्या धर्माचा असे अभिमानाने सांगत असल्याचे चित्र दिसत आहे मात्र देशातील समाजातील सर्व घटकांनी भारतीय म्हणूनच आपली ओळख दिली पाहिजे अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली.

 यावेळी प्रा. रवींद्र कोकरे यांनी स्वातंत्रवीर सावरकरांचे जीवन चरित्र आपल्या भाषणातून उलगडून दाखविले. ॲड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, डॉ. प्रवीण आगवने, संतोष सावंत यांनी मनोगते व्यक्त केली.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला मलठण येथील शंभू महादेवाच्या मंदिरापासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी केले तर आभार भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी मानले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER