फलटण | धैर्य टाईम्स |
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे धाकटे बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ते लवकरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे माहिती मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच संजीवराजे यांनी खासदार शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. संजीवराजे यांनी खासदार पवार यांच्या पक्षात प्रवेश करून देखील घडाळाच्या चिन्हावर आमचाच उमेदवार फलटण येथे निवडून आल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. तर पुन्हा एकदा संजीवराजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
रामराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादा यांची भेट घेतली असून या बाबत अजून निर्णय झाला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितले. राज्यसभा सदस्य नितीन पाटील व स्थानिक नेत्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल मात्र चांद्यापासून बांध्यापर्यत इन्कमिंग सुरु झाल्याचे तटकरे म्हणाले.