फलटण - मा. नगरसेवक व शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष फिरोज आतार, प्रीतम बेंद्रे (आबा )यांनी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
फलटण नगर परिषदेचे मा. नगरसेवक व शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष फिरोज आतार यांनी आज खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. 2011 साली फिरोज आतार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून फलटण नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते, तसेच फलटण मधील सर्वात मोठ्या शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष असलेल्या फिरोज आतार यांना फलटण शहरात त्यांना मानणारा मोठा युवा वर्ग आहे, मितभाषी असलेले सर्वसामान्यांच्या मदतीला कायम धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असून फिरोज आतार यांच्यासारखा चेहरा भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे निश्चितच फलटण शहरातील भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असल्याचे मत खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी आपले पूर्ण योगदान देऊ व खासदार साहेब देताल ती जबाबदारी पूर्ण ताकतीने पार पाडू असे फिरोज आतार त्यांनी सांगितले.
यावेळी जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव,तुकाराम शिंदे,अनुप शहा, अमोल सस्ते, देवाअण्णा पाटील, सचिन अहिवळे, डॉक्टर प्रवीण आगवणे , मेहबूबभाई मेटकरी,राहुल शहा, रियाज इनामदार,निलेश चिंचकर, संजय गायकवाड,वसीम मनेर, राजाभाऊ देशमाने, राजाभाऊ नागटिळे, प्रसाद पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.