फलटण प्रतिनीधी:- फेसबुक, व्हॉट्सअॅप, स्काइप, इंस्टाग्राम या सगळ्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात आजही अनेक नागरिकांचा पोस्ट विभाग यांच्यावरील विश्वास उडालेला नाही. आजही अनेक कामांसाठी पोस्ट कार्यालय हेच अंतिम ठिकाण असते. तर नोटीस वा शासकीय कामांसाठी पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड गरजेचे असते. मात्र साध्य हिच पाकिटे व पोहच कार्डबळ शहरातील पोस्ट ऑफिसमधूनच गायब झाल्याचे चित्र असल्याने फलटणकर त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून कार्यालयांमध्ये पोस्ट पाकिटे व पोहच कार्डचा कृत्रिम तुटवडा आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. पाच रुपयांची पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड मिळत नसल्याने नागरिकांवर सतत हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. हीच पोस्ट पाकिटे बाजारपेठेतील अनेक दुकानात चढ्या भावाने मिळत असल्याने पोस्ट कार्यालयाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील शंकर मार्केट परिसरातील मुख्य कार्यालयांमध्ये पाच रुपयात मिळणारी पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड तुटवडा सुरू आहे. या कार्यालयांमध्ये विचारणा केली असता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. सतत मुख्य कार्यालयातून पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड उपलब्ध नाहीत, असे सांगितले जाते. तर कधी पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड यांचा वरिष्ठ कार्यालया कडूनच तुटवडा आहे, असेही सांगितले जाते. अशा कारणांमुळे अनेक दिवस नागरिकांना पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड मिळत नसून, मिळालीच तर ती हव्या त्या संख्येने उपलब्ध होत नाहीत.
आजही शासकीय स्तरावर व खाजगी संस्था यांना पत्रव्यवहारासाठी पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड वापर करतात. आता मात्र, ही कार्ड मिळतच नसल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.हीच पाच रुपयात मिळणारी पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड अनेक दुकानांमध्ये चढ्या दराने मिळत असल्याने पोस्टातून मिळणारी पाकिटे दुकानात कशी उपलब्ध होत आहेत यामागे कोणते व कोणाचे अर्थकारण लपले आहे याचा शोध घेण्याची गरज आहे.
या संदर्भात पोस्टातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनीही या विषयी विविध कारणे देत आहेत. या संदर्भात वारंवार पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड घेण्यासाठी पोस्टात येणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, 'गेल्या अनेक महिन्यापासून पोस्ट कार्यालयात फेऱ्या मारल्या, पण पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड तुटवडा आहे तसाच आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे दिली जातात. आम्ही सातत्याने पोस्ट कार्डाचा वापर करतो. पण पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड मिळत नसल्याने सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खाजगीत दुकानातून पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड मिळत आहेत पण त्यांना वाढीव दराने पैसे द्यावे लागतात असे अनेक नागरिकांनी सांगितले. पाच रुपयात मिळणारी पोस्ट पाकिट व पोहच कार्ड मिळत नसल्याने पांढऱ्या पाकिटे व झेरॉक्स काढलेले पोहच कार्ड नागरीकांना वापरावे लागत आहेत.
अधिकच्या अर्थकारणात पोस्ट कार्यालयातून खाजगी दुकानात पोहचणारी पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड पोस्टात न मिळाल्यास लवकरच पोस्टाची पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड पोस्ट ऑफिस मधून इतिहास जमा होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थकारण प्रक्रियेत न पडता नेमून दिलेली सेवा पार न पडल्यास आगामी काळात पोस्ट विभागाची वाटचाल खाजगीकरणाकडे होताना दिसेल यात शका वाटायला नको.
मागणीप्रमाणे पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड याचा पुरवठा वरिष्ठ कार्यालयाकडून होत नाही त्यामुळे पोस्ट पाकिटे व पोहच कार्ड याचा तुटवडा जाणवत आहे. - स्वप्निल वाघमारे,पोस्ट मास्तर, फलटण पोस्ट ऑफिस
अनेक महिन्यांपासून पोस्टात हेलपाटे मारूनही पोस्ट पाकिटवर पोस्ट कार्ड मिळत नसून अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे पोस्ट कार्यालयातील अधिकारी लक्ष देत नाही.- सदाशिव जाधव, ज्येष्ठ नागरिक, फलटण