फलटण प्रतिनिधी :
येथील दैनिक लोकमतचे पत्रकार विकास शिंदे यांच्या मातोश्री व ज्येष्ठ लेखिका सौ. सुलेखा सुरेश शिंदे यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर काल दिनांक २३ मार्च रोजी फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मलठण येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, तसेच सामाजिक, राजकीय, साहित्य यासह पत्रकार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.