गोवारे गाव कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आहे. येथील ग्रामस्थ कृष्णा कॅनॉल लगतच्या रस्त्याचा वापर दळणवळणासाठी करतात. परंतु, या रस्त्याचे डांबरीकरण होऊन ८ वर्षे झाली. मात्र, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून तो वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. अन्यथा, बळीराजाच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
कराड : गोवारे गाव कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आहे. येथील ग्रामस्थ कृष्णा कॅनॉल लगतच्या रस्त्याचा वापर दळणवळणासाठी करतात. परंतु, या रस्त्याचे डांबरीकरण होऊन ८ वर्षे झाली. मात्र, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून तो वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. अन्यथा, बळीराजाच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कृष्णा कॅनॉल गोवारे-हनुमाननगर या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे शाळेत जाताना विद्यार्थी, विद्यार्थिनी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. तसेच शेतकऱ्यांचीही गैरसोय होत आहे. या रस्त्याची असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे सदर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे. अशी मागणी ग्रामस्थांची मागणी आहे.
तसेच जर या मागणीकडे दुर्लक्ष करून सदर रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास बळीराजा शेतकरी संघटना, सर्व गोवारे हनुमाननगर व चौडेश्वरीनगर येथील ग्रामस्थांना घेऊन मोठे आंदोलन उभा करेल. त्याचबरोबर आगामी सर्व निवडणुकीत लोकप्रतिनिधींना गावबंदीही करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी लोकप्रतिनिधी यांची राहणार असल्याचेही सदर प्रसिद्धीपत्रकात मुल्ला यांनी नमूद केले आहे.