Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचे उल्लंघन ? अकॅडमी व्यवसाय उफाळले नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन करणार – सनी काकडे माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे मानेवाडी येथे प्रात्यक्षिक : युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर

आपत्ती काळात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य -पालकमंत्री शंभूराज देसाई

प्रशासकीय यंत्रणांनी 24X7 सतर्क राहण्याचे निर्देश
टीम : धैर्य टाईम्स

सातारा, दि. 25: सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वसामान्य माणसांची कोणत्याही स्थितीत गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी. दरड प्रवण क्षेत्र, भूस्खलन बाधीत क्षेत्र या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे त्वरीत स्थलांतर करण्यात यावे. पुढील तिन दिवस अतिवृष्टीचे वर्तविण्यात आले असून यंत्रणांनी 24X7 सतर्क रहावे. कोणत्याही स्थितीत नागरिकांच्या जीवाला सर्वोच्च प्राधन्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात अतिवृष्टीबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अरुण नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्यासह प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी दृरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळांवर गर्दी होते हे लक्षात घेऊन धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी करावी. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा ठिकाणी पोलीस पेट्रोलींग वाढवावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील सर्व आरोग्य केंद्रांवर आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध ठेवावा. दिवसा तसेच विशेषत: रात्रीच्या वेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची कार्यस्थळावर उपस्थिती बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी आवश्यक कार्यवाही करुन वाहतूक सुरुळीत करण्यात यावी. भूस्खलन प्रवण तसेच दरड प्रवण क्षेत्रामध्ये कोणत्याही स्थितीत नागरिक राहणार नाही याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी. नागरिकांना आवश्यकता भासल्यास सक्तीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावे. क्षेत्रीयस्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी धोकादायक गावांना भेटी द्याव्यात. पोलीस पाटील, ग्रामसेवक, कोतवाल यांनी मुख्यालय ठिकाणी राहण्याच्या सूचनाही दिल्या.

 घरांची पडझड, गुरांचे गोटे, मयत पशुधन इत्यादींचे पंचनामे तात्काळ करुन आर्थिक मदतीसाठी अहवाल सादर करावेत. दुर्घटना घडून व्यक्ती मयत झाल्यास वारसांना त्वरीत मदतीचे वाटप करावे. पूरप्रवण गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी अन्न, पिण्याचे पाणी अनुषंगीक प्राथमिक सुविधांचे नियोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

ज्या ठिकाणी रस्ते, पुल पाण्याखाली जातात त्या ठिकाणी आवश्यक बॅरेकेटींग करुन लोकांना जाण्यास प्रतिबंध करावा. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास त्वरीत सुरळीत करण्यात यावा. जिल्ह्यात 100 टक्के पेरण्या झाल्या असून ज्या भागात पावसाने नुकसान झाले आहे त्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करावे. मोठ्या पावसामुळे ओंढ्याचे पात्र बदलते त्यांचे प्रवाह शेतात जावून शेतीचे नुकसान होते अशा नुकसानीचेही पंचनामे तात्काळ करावेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाचा अंदाज घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात यावा व आवश्यकता भासल्यास शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिलह्यातील सर्व प्रांताधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वस्थितीत यंत्रणांनी दक्ष राहून समन्वयाने, संवेदिशिलपणे काम करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी जिल्ह्यात आत्तापर्यंत 143 टक्के पाऊस झाला असून एकूण सरासरीच्या 66.8 टक्के हा पाऊस आहे. सद्यस्थितीत सर्व प्रमुख धरणे 70 टक्के भरली आहेत. कोयना धरणातून 11 हजार क्युसेक्स तर कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला पुढील दोन दिवस रेड अलर्ट व त्यानंतर चार दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, अशी माहिती बैठकीत दिली. यावेळी त्यांनी आपत्ती काळात नागरिकांच्या सुरिक्षतेसाठी व मदतीसाठी प्रशासन सज्ज असून प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपायोजनांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.

क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना अडचण आसल्यास तात्काळ दूरध्वनी संपर्क साधावा. त्यांना तात्काळ मदत पुरविण्यात येईल. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले दूरध्वनी बंद ठेवू नयेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत दिले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER