महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम जरूर ग्रामीण भागापासून शहरापर्यंत केले पाहिजेत. परंतु, त्याचबरोबर महापुरुषांच्या विचारांचे अनुकरणही केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांनी केले.
कराड : महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम जरूर ग्रामीण भागापासून शहरापर्यंत केले पाहिजेत. परंतु, त्याचबरोबर महापुरुषांच्या विचारांचे अनुकरणही केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांनी केले.
पाडळी (केसे) ता. कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दिलीप महाजन बोलत होते.
यावेळी आदर्श माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पुजारी, अजिंक्य महिला मंडळाच्या अध्यक्षा जुबेदा मुजावर आदी. उपस्थित होते.
महाजन म्हणाले, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ढोल-ताशे वाजवून जयंत्या साजर्या केल्या जातात. त्याबद्दल हरकत नाही. परंतु, हे करत असताना महापुरुषांना फक्त डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन चालने अत्यंत गरजेचे आहे. हे तरुणांनी समजून घेतली पाहिजे.
स्वागत आणि प्रास्ताविक विश्वास मोहिते यांनी केले. तर आभार आबासाहेब वाघमारे यांनी मानले.