फलटण प्रतिनिधी : 2 ऑगस्ट
फलटण येथील प्रा.गणेश नांदले यांचे अल्पशा आजाराने पिंपरी - चिंचवड (पुणे ) येथील सरकारी दवाखान्यात निधन झाले. ते 47 वर्षांचे होते.
त्यांनी प्रेमीलाताई हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण व सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण येथे काही काळ अध्यापणाचे कार्य केले.
त्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिभेला वाव देत विपणन व्यवस्थापन करीत आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत वेगळी वाट चोखालळी.
काही वर्षांपासून त्यांनी ग्राफिक्स डिझाईनर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी पिंपरी - चिंचवड ( पुणे ) येथे श्रीराम अकॅडमीची सुरुवात करीत पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश केला होता. मात्र काळाले त्यांच्या वर घाला घातला व त्यांचे या क्षेत्रातील स्वप्न अपुरेच राहिले.त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, भाऊ.भावजय, चुलते असा परिवार आहे.
त्यांच्या अकस्मात निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
त्यांच्यावर गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता धुळदेव ता. फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.