फलटण प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदार संघासाठी आज वंचित बहुजन आघाडी कडून सोलापूर या ठिकाणी रमेश बारस्कर यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी करता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी असल्याची प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रमेश बारस्कर यांनी प्रतिक्रिया दिली. तर माढ्याच्या या निवडणुकीमध्ये सुज्ञ जनता प्रस्थापित घराण्यांना आणि त्यांच्या उमेदवारांना नाकारून येणारा काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय करतील असा विश्वास असल्याचे बारस्कर म्हणाले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.