फलटण │ तहसील कार्यालय परिसर हे नागरिकांच्या शासकीय कामकाजाचे प्रमुख केंद्र असताना, सध्या या आवारात खाजगी व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे नारळ विक्रीचे दुकानं सुरु आहे. या विक्रेत्याने अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाची जमीन व्यापून व्यवसाय सुरू असून, त्याकडे प्रशासनाकडून जाणूनबुजून डोळेझाक केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
नागरिकांकडून वारंवार तक्रारी देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शासकीय कार्यालय परिसरातील शिस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय कार्यालयाजवळील अशा अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो असून, नागरिकांना आपले काम उरकण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अभाव दिसून येत आहे. या अतिक्रमणातून काहींना अप्रत्यक्षपणे संरक्षण मिळत असल्याची कुजबुजही सुरू आहे.
नागरिकांची मागणी आहे की, तहसीलदार, बांधकाम आणि संबंधित विभागाने तातडीने अतिक्रमण हटवून शासकीय जागा मोकळी करावी आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.











