Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार

फलटण नगरपालिकेत उद्या होणार ऐतिहासिक पदग्रहण सोहळा - 35 वर्षाच्या सत्ता परिवर्तन तर फलटणमध्ये उत्साहाची लाट

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | प्रतिनिधी

फलटण नगरपालिकेच्या राजकारणात उद्या एक नवा आणि ऐतिहासिक अध्याय लिहिला जाणार आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर झालेल्या राजकीय सत्ता परिवर्तनानंतर फलटणमध्ये परिवर्तनाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर उद्या सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता अधिकृतपणे नगराध्यक्ष पदग्रहण करणार आहेत. 


सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी जनतेच्या विश्वासाच्या जोरावर हे सर्वोच्च नागरी पद पटकावले असून, त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या विजयाने केवळ सत्तांतरच नव्हे तर फलटणच्या राजकारणात नवी दिशा मिळाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

उद्याच्या पदग्रहण सोहळ्यामुळे फलटण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरभरात आनंद, जल्लोष आणि अपेक्षांची लाट पाहायला मिळत असून, हा ऐतिहासिक क्षण छायाचित्रे आणि व्हिडिओंच्या माध्यमातून “फ्रेम”मध्ये कैद होणार आहे.

या पदग्रहण सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढले आहे. नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता असून, फलटणच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात उद्यापासून होणार असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

फलटणकरांसाठी उद्याचा दिवस केवळ पदग्रहणाचा नसून, नव्या आशा, अपेक्षा आणि परिवर्तनाच्या स्वप्नांचा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.


फलटण नगरपालिकेच्या राजकारणात उद्या एक ऐतिहासिक क्षण साकारत असताना, या आनंदाच्या क्षणी एक भावनिक पोकळीही प्रकर्षाने जाणवणार आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी त्यांचे वडील, माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांची उणीव सर्वांनाच भासणार आहे.

फलटणच्या राजकारणात मोलाचे योगदान देणारे, दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कै. हिंदुराव नाईक निंबाळकर हे जनतेच्या मनात आजही आदराने स्मरले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते घडले आणि सार्वजनिक जीवनात मूल्यांची परंपरा निर्माण झाली.

आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत समशेर सिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष पदाची शपथ घेणार असले, तरी या ऐतिहासिक क्षणी वडिलांची छाया, त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद नसल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. कार्यकर्ते, समर्थक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून “आज हिंदुराव नाईक निंबाळकर असते तर…” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

हा पदग्रहण सोहळा जरी विजयाचा आणि परिवर्तनाचा असला, तरी त्यामागे कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या विचारांची आणि कार्याची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारीही समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर येऊन ठेपली आहे. फलटणच्या विकासाच्या या नव्या पर्वात त्यांच्या आठवणी कायम प्रेरणादायी ठरणार आहेत.

यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले माजी नगराध्यक्ष, शिवरूपराजे खर्डेकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ॲड. नरसिंह निकम अध्यक्ष फलटण तालुका संघर्ष समिती, सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या, सौ प्रतिभाताई शिंदे तालुका अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपस्थित राहणार आहेत.

तरी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील सर्व घटक पक्ष, पदाधिकारी, सर्व नागरिक, व्यापारी, महिला व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER