फलटण प्रतिनिधी -
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९८ व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५ फलटण यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या व सर्व बांधव, जनसमुदाय यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025 च्या वतीने थंडपेय ( लस्सी ) वाटप करण्यात आली.
यावेळी जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी गणेश अहिवळे, अजय काकडे,गोविंद काकडे, सुरज काकडे, सिद्धार्थ अहिवळे, भूषण बनसोडे, चंद्रकांत मोहिते, मंगेश सावंत, कपिल काकडे व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.