फलटण प्रतिनिधी -
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेतून अज्ञान, अन्याय, अनीती, अंधश्रद्धा, अत्याचार, अस्पृश्यता, विषमतेसारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी यशस्वी लढा दिला. महिलांसाठी देशातील पहिली शाळा सुरु करुन स्त्रीशक्तीसाठी शिक्षणाची दारं खुली केली. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी, केलेला त्याग आणि घेतलेल्या परिश्रमांचे फळ आहे,” अशा शब्दात तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे. यावेळी निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, गोविंद भुजबळ,पत्रकार विकास शिंदे, बापूराव शिंदे यांच्यासह जयंती उत्सव समितचे मान्यवर उपस्थित होते.