फलटण प्रतिनिधी -
फलटण तालुक्यातील सन २०२५ ते सन २०३० दरम्यान होणाऱ्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांमधील थेट सरपंच आरक्षण सुनिश्चित करण्याची कार्यवाही गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी दहा वाजलेपासून पंचायत समिती सभागृह फलटण या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
अवर सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे अधिसूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या निर्देशानुसार फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमधील थेट सरपंच आरक्षण सुनिश्चित करण्याची कार्यवाही होणार असल्याचे डॉ. जाधव यांनी म्हटले आहे.